राज्यातील दैनंदिन तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, अवकाळी पाऊस, वावटळ आणि उकाडा यामुळे गोवंशाचे आरोग्य खालावण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक गोशाळात सकस चारा उपलब्ध नसल्यामुळे साठवणूक केलेली सोयाबीन, तुर, गहू, हरभरा आणि इतर पिकांची गुळी गोवंशाच्या आहारासाठी वापरण्यात येत आहे. या निरीक्षणामुळेच गोशाळा संचालकांसाठी खालील प्रमाणे गोवंशाची काळजी घेण्याच्या शिफारसी करण्यात येत आहेत.
- सकाळी आठ ते दुपारी पाच गोवंश चरावयासाठी बाहेर अजिबात सोडू नका.
- गोशाळेतील उपलब्ध चारा, कुट्टी, गुळी पहाटे पाच वाजता पूरवा आणि त्यानंतर दुपारी तीन नंतरच अशाच प्रकारचा आहार पूरवावा
- उपलब्ध गुळी किमान दोन तास ओली केल्याशिवाय गोवंशास खायला देऊ नका.
- उपलब्ध वाळलेली गुळी दोन टक्के गुळ आणि मीठ वापर करून पूरवा.
- उन्हाळ्यात वाळलेला चारा युरिया प्रक्रिया करून वापरण्याची शास्त्रीय शिफारस नेहमी केली जाते, त्यासाठी जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करा.
- चाऱ्याची कमतरता अधिकच्या पशुखाद्यातील पोषणमूल्यतून पुरवता येणे शक्य असते.
- दिवसभर स्वच्छ ताजे थंड पाणी गोवंशास उपलब्ध करा
- मुक्त संचार पद्धतीमुळे उष्णतेचा ताण कमी करता येतो
- प्रत्येक गोठ्यात भिंतीवर असणारे तापमापक लावा म्हणजे उष्णतेची तीव्रता कळू शकेल.
- दुपारच्या उष्णतेच्या झळया ओले पडदे वापरून कमी करता येतात.
- सावलीतही उन्हाच्या झळया गोवंशास ताण निर्माण करतात.
- गोवंशाच्या शरीरातील ऊर्जा आणि पाणी प्रमाण कमी होणार नाही, याची दक्षता घ्या.
- बसलेल्या गोवंशास श्वसनदर वाढलेला दिसून आल्यास पाठीवर ओले होते टाका.
- वाढीची वासरे आणि वृद्ध गोवंश उष्णतेचा त्रास सहन करू शकत नाही.
- हायड्रोपोनिक्स आणि आझोला तंत्राचा भरपूर वापर उन्हाळ्यात करता येतो.
- गोठ्यातील विद्युत तारा लोंबकळणार नाहीत, छताचे पत्रे सहज दिले होणार नाहीत, विनाकारण अनावश्यक लाकडी वस्तू गोठ्यात दिसून येणार नाहीत याची काळजी घ्या.
- लसीकरण, उपचार सकाळच्या थंड वातावरणात अवलंबा
- पिण्याच्या पाण्याची भांडी, पात्र सावलीत असतील याकडे लक्ष द्या
- भूक मंदावलेल्या, आजारी, अशक्त गोवंशावर पशुवैद्यकाकडून उपचार अवलंबा
- किमान एक आठवड्यासाठी चारा आणि पाणी उपलब्धतेचे नियोजन करा
- ताक, क्षार, सोडा, मीठ आणि गुळ ही उन्हाळ्यात आरोग्य संजीवनी असते.
- मोठ्या / लांब पात्याचे पंखे, तुषार, ठिबक यांचा वापर उन्हाळ्यात उपयुक्त ठरतो.
- मोठ्या / लांब पात्याचे पंखे, तुषार, ठिबक यांचा वापर उन्हाळ्यात उपयुक्त ठरतो.
- गोठ्याचे छत थंड केल्यास गोठ्यातील तापमान चार पाच अंशाने कमी होते.
- पर्यायी पशु आहार घटक जसे की, फळांच्या साली- कोया- बिया-गर इत्यादी बाबी भरपूर प्रमाणात उपलब्ध असल्या तरी एकावेळी एका दिवशी दहा टक्के पेक्षा अधिक प्रमाणात वापरू नयेत.
पशुवैद्यकीय सल्ला घेण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करा.